¡Sorpréndeme!

Eknath Shinde Buldhana | कार्यकत्यांचे आभार मानण्यासाठी आज बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची आभार यात्रा

2025-04-27 0 Dailymotion

Eknath Shinde Buldhana | कार्यकत्यांचे आभार मानण्यासाठी आज बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची आभार यात्रा 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा येथे आभार दौऱ्यावर आहेत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे जिल्ह्यात खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड हे निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे आज आभार यात्रा दौऱ्यावर बुलढाण्यात आहे. बुलढाण्यात ते एक सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.खरंतर एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा टीका केली आहे. तसेच शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांवर केलेल्या टिके मुळे काल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी..